गांधी तलावातील तळ काँक्रिटीकरणाचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:22 AM2019-12-15T01:22:01+5:302019-12-15T01:24:27+5:30
गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने कामासंदर्भात सल्लागार कंपनीलाच अहवाल देण्यास सांगितले असून, त्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच हे काम सुरू होऊ शकेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नाशिक : गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने कामासंदर्भात सल्लागार कंपनीलाच अहवाल देण्यास सांगितले असून, त्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच हे काम सुरू होऊ शकेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या कामाविषयी तज्ज्ञांमध्येच मतभिन्नता असली तरी कंपनीच्या कामाला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली असली तरी आता या विषयावर खल सुरू झाल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोदावरी नदीतील विविध कुंडांचे तळ काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. आता ते काढण्याबाबत दुमत असले तरी आता ते काढण्याबाबत पर्यावरणप्रेमींची मागणी झाली आणि न्यायालयानेदेखील त्याबाबत प्रशासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर याचिकाकर्त्यांना प्रशासनाला सादरीकरण करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर त्यात या कामाचा समावेश करण्यात आल्या. कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आणि निविदा मंजुरीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आता कॉँक्रिटीकरण करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याने नव्याच वादाला सुरुवात झाली. शुक्रवारी (दि.१३) कंपनीच्या वतीने शुभारंभ करण्यात येणार होता. सर्व प्रथम गांधी तलावातून हे काम सुरू करण्यात येणार असल्याने त्यात जाणारे पाणी थांबवून तलावातील कचरा, गाळ काढण्यात आले. दरम्यान, या कामाला काहींनी विरोध केला. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने स्मार्ट सिटी कंपनीच्या सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि