जोरणच्या गटारी झाल्या भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:41 PM2019-07-15T17:41:24+5:302019-07-15T17:41:50+5:30
दखल : ग्रामपंचायतीने सांडपाण काढले गावाबाहेर
जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील गावातील सांडपाणी हे गेल्या अनेक वर्षापासुन गटारींची कामे केली नसल्याने ती एक मोठी समस्या बनली होती. ‘लोकमत’ने गावातील समस्याचा फेरा याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर ग्रामपंचायतीने उघड्या गटारी भूमिगत करत सांडपाणी गावाबाहेर काढले आहे.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील गटारींची पाहणी केली व सांडपाण्याच्या निच-यासंबंधी नियोजन करण्यात आले. त्यानुसार गावातील सांडपाणी हे बंदिस्त गटारींचे काम करु न गावाबाहेर काढण्यात आले. गावातील काही भागातील गटारी व रस्ते सारखे झाले होते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत डबकी साचत होती. या दुषीत पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत होते. मात्र आता भुमिगत गटारी करु न ठिकठिकाणी चेंबर उभारण्यात आले असून सांडपाणी गावाबाहेर काढण्यात आले आहे. आता पावसाळ्यात कोणत्याच भागात डबकी साचणार नाहीत यानुसार गटारींची कामे करण्यात आली आहेत.
गटारींची कामे मार्गी
गावातील नागरिकांच्या अनेक वेळा तक्र ारी आल्या होत्या.मात्र निधी अभावी काम करता येत नव्हते. लोकमतने सदर प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून दिल्यानंतर आम्हाला दुसरा निधी वर्ग करु न गावातील सांडपाणी गटारींची कामे त्वरीत करावी लागली. या विषयी ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने बैठक घेवून बंद गटारींची कामे मार्गी लावण्यात आली. उर्वरित कामही तातडीने करण्यात येईल.
- धीरज कापडणीस, ग्रामसेवक , जोरण.