नाकाबंदीत आढळला मजुरांचा जत्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:24 PM2020-04-16T17:24:30+5:302020-04-16T17:25:59+5:30
लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी व भोजनाची पाकिटे देऊन पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.
येवला : लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी व भोजनाची पाकिटे देऊन पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने सर्व बाजारपेठा, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी बेरोजगार कष्टकरी, मजूरांची मोठी फौज आपल्या घराकडे परतण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करीत आहे. काहींनी तर साधन सुविधा नसल्याने पायपीट करत मार्गक्र मण करण्याचा मार्ग पत्करला आहे. कष्टकरी, मजूरांचे घराकडे परतणारे हे जथ्थे थांबायला आजही तयार नाहीत. गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ चाकणहून उत्तरप्रदेशकडे ट्रकने जाणाऱ्या मजूरांचा जथ्था पोलिसांना नाकाबंदीत आढळला. याबरोबरच काही पायी प्रवासीही होते. ट्रकमध्ये सुमारे शंभर मजूर होते. या मजूरांबाबत सोशल फोरमला माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी व भोजनाची पाकीटे दिली त्यानंतर पोलिसांकडून त्यांना परत पाठविण्यात आले.