गटांसाठी आठ, तर गणांसाठी २५ अर्ज
By admin | Published: February 5, 2017 11:33 PM2017-02-05T23:33:45+5:302017-02-05T23:34:05+5:30
सिन्नर : शेवटच्या दिवशी भरणार इच्छुकांची जत्रा
सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी आठ, तर पंचायत समितीच्या गणांसाठी २५ असे ३३ अर्ज दाखल झाले. सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आजपर्यंत एकूण ११, तर पंचायत समितीसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी दाखल झालेले जिल्हा परिषद गटनिहाय अर्ज पुढीलप्रमाणे- मुसळगाव- नीता एकनाथ सानप (अपक्ष), नांदूरशिंगोटे- रमेश बन्सी कुटे (शिवसेना), मंगेश लक्ष्मण शेळके (भाजपा), नीलेश देवराम केदार (शिवसेना), दीपक जबाजी बर्के (शिवसेना). चास- शीतल उदय सांगळे (शिवसेना), अर्चना सखाहरी ढोली (अपक्ष). ठाणगाव- वनिता नामदेव शिंदे (शिवसेना). रविवारी गणनिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे- नायगाव- उदय पुंजाभाऊ सांगळे (शिवसेना), बबन भाऊसाहेब लोहकरे (अपक्ष). माळेगाव- शरद लक्ष्मण पवार (भाजपा). मुसळगाव- सुमन राजाराम बर्डे (शिवसेना). गुळवंच- वर्षा हेमंत भाबड (भाजपा), वर्षा कचरू शेळके (भाजपा). देवपूर- रमेश म्हाळू तुपे (भाजपा), सीताराम गणपत गिते (शिवसेना), विजय सूर्यभान गडाख (अपक्ष). भरतपूर- सुजाता भाऊसाहेब नरोडे (भाजपा), विमल भाऊसाहेब नरोडे (भाजपा). पांगरी- संपत कारभारी पगार (शिवसेना), विजय भीमराव काटे (भाजपा). नांदूरशिंगोटे- ज्योती अजय सानप (अपक्ष), ज्योती अजय सानप (कॉँग्रेस), योगिता अशोक केदार (भाजपा), सुमनबाई सावळीराम केदार (भाजपा). चास- भारत कचरू शेळके (शिवसेना), उदय पुंजाभाऊ सांगळे (शिवसेना). डुबेरे- उषा सोमनाथ कराड (अपक्ष), शीलाबाई मधुकर चकोर (अपक्ष), मनीषा संदीप खताळे (शिवसेना), अर्चना सखाहरी ढोली (शिवसेना), नंदाबाई अजय कडाळे (मनसे). ठाणगाव- छाया जनार्दन पवार (शिवसेना). (वार्ताहर)