कांद्याला समाधानकारक दर नसल्यामुळे उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 09:04 PM2020-05-10T21:04:44+5:302020-05-10T21:05:40+5:30

पांडाणे : सध्या कोरोणा विषाणूने संपूर्ण भारतात हात पाय पसरले असून, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. तसेच पांडाणे परिसरात कांदा काढणीस सुरुवात झाली असून, बाजारात कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे.

Growers in trouble due to unsatisfactory rates for onions | कांद्याला समाधानकारक दर नसल्यामुळे उत्पादक अडचणीत

कांद्याला समाधानकारक दर नसल्यामुळे उत्पादक अडचणीत

Next
ठळक मुद्दे व्यापारी दर पाडून चार ते पाच रु पये किलोने कांदा मागत आहेत,

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : सध्या कोरोणा विषाणूने संपूर्ण भारतात हात पाय पसरले असून, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. तसेच पांडाणे परिसरात कांदा काढणीस सुरुवात झाली असून, बाजारात कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे.
कोरोनामुळे सध्या सगळ्या देशात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू आहे. लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत. कांदा उत्पादनासाठी झालेला खर्चदेखील यावर्षी निघाला नसल्याचे सांगताना कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. व्यापारी दर पाडून चार ते पाच रु पये किलोने कांदा मागत आहेत, तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा शेतातच पडून असल्याने मातीमोल दरात विकण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे शेतकरी यांनी सांगितले.
दिंडोरी तालुक्यात यावर्षी कांद्याचे चांगले पीक झाले होते. पीक जोरात आले मात्र, बाजारपेठा खुल्या नसल्यामुळे कांद्याचे पीक अद्याप शेतातच पडून आहे. व्यापारी दर पाडून कांदा मागत आहेत. मात्र, शेतात पडलेला कांदा विकावा तर परवडत नाही आणि नाही विकावा तर पावसाचे दिवस जवळ आले आहे. त्यामुळे सगळा कांदा खराब होऊन जाईल. मदतीचा हात द्यावाअशा द्विधा मन:स्थितीत सध्या नाशिक जिल्ह्यातील हे कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. एवढा मोठा खर्च करून देखील आमच्या पदरात काहीच पडले नाही. असे सांगताना शासनाने कांदा उत्पादकांसाठी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कृष्णा वाघ या कांदा उत्पादक शेतकऱ्यानी केली आहे.

Web Title: Growers in trouble due to unsatisfactory rates for onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.