हिरव्या मिरचीचे दर घसरल्याने उत्पादकांना लागला ‘ठसका’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:05+5:302021-09-05T04:18:05+5:30
यावर्षी सुरुवातीला अपेक्षित असा भाव मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन मोठा खर्च करून मिरचीचे नियोजन केले. ...
यावर्षी सुरुवातीला अपेक्षित असा भाव मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन मोठा खर्च करून मिरचीचे नियोजन केले. सुरुवातीला बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने क्विंटलला चार ते पाच हजारांपर्यंत भाव मिळाला. मात्र, जसजशी मिरचीची आवक वाढली तसतसे मिरचीचे भाव उतरतच गेले. सध्या हे भाव पाचशे ते सातशे रु.प्रति क्विंटल पोहोचले आहे. परिसरात सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोग पडला असल्याने शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून मिरची वाचविण्याचे प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मरावे की जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अचानकच दीड हजार रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले आहे. मिरची लागवडीपासून ते आतापर्यंत भरपूर असा खर्च व विविध रोगांचा सामना करावा लागतो. परंतु अचानकच मिरची पिकाची आवक वाढल्याने व भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च मजुरांचे पैसे निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पूर्वहंगामी लावलेल्या मिरचीला सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असल्याने लागवड केली. त्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने टँकरद्वारे विकत पाणी घेऊन मिरची पिकाला पाऊस पडेपर्यंत कसेबसे जगविले, त्यामध्ये आठ दिवसांपूर्वी पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रात्रीच्या लाईटद्वारे मिरची पिकाला पाणी द्यावे लागले. परंतु, इतर राज्यात मिरची पिकाची आवक वाढल्याने राज्यातील व्यापारीसुद्धा मिरची कमी भावाने खरेदी करीत आहेत.
कोट...
एप्रिल महिन्यामध्ये रोपांची लागवड केलेली आहेत. आतापर्यंत रासायनिक खते कीटकनाशक औषधे असा भरपूर खर्च मिरची पिकावर केलेला आहे. आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री केली. परंतु, भाव घसरल्याने खर्चही निघत नाही, तोच मिरचीची आवक वाढल्याने २५०० रुपयांनी भाव कमी झाल्याने नुकसान होत आहे. मजुरांचा खर्चही निघत नसल्याने इतर खर्च कसा निघेल असा प्रश्न पडला आहे.
- शांताराम खालकर, शेतकरी, भेंडाळी
इन्फो...
- ५०० ते ७०० रु. प्रति क्विंटल भाव
- १५०० रुपयांनी भाव घसरला
- वाहन खर्चसुद्धा खिशातून
- पावसामुळे मिरचीवर बुरशी
- शेतकऱ्यांना आर्थिक फटका
040921\04nsk_26_04092021_13.jpg
मिरची