भाज्यांचे दर कोसळल्याने उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:48 PM2020-03-18T12:48:03+5:302020-03-18T12:49:50+5:30
पाटोदा : .गेल्या एक दिड महिन्यांपासून भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ते अडचणीत सापडले आहे.
पाटोदा : .गेल्या एक दिड महिन्यांपासून भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ते अडचणीत सापडले आहे. ओ भाऊ .... ओ ताई ..... ओ मावशी ,काका घ्याना पाच रु पयांना पाच किलो दराने शेतकऱ्याचा माल विकला आहे. असा आवाज सध्या बाजारात ऐकू येत असून शेतकऱ्यांची झालेली परवड या आवाजात दिसून येत असल्याचे चित्र पाटोदा ,शिरसगाव ,पिंपळगाव लेप,विखरणी व कातरणी येथील आठवडे बाजारात दिसून येत आहे या आठवडे बाजारात मेथीची मोठी जुडी पाच रु पयांना दोन कोबी,फ्लॉवर पाच रु पयांना पाच ते सात किलोचे दोन गड्डे,टमाटे दोन रु पये किलो वांगी पाच रु पये किलो अशा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने शेतकºयांना तोट्यास सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अवकाळीच्या रूपाने का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरी.बोरवेल व शेततळ्यात मुबलक पाणी असल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामातील गहू , हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच भाजीपाला पिके घेतली. सर्वच पिके एकच वेळी बाजारात येत असल्याने भाजीपाला पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकर्यांना नफा सोडाच या पिकासाठी केलेला लागवड खर्च व उत्पन घेण्यासाठी केलेला खर्चही न निघाल्याने उत्पादक अडचणीत सापडला आहे.