करवाढीविरोधात घमासान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:59 AM2017-08-20T00:59:08+5:302017-08-20T01:01:50+5:30
नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीला दिलेल्या मंजुरीचे तीव्र पडसाद शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने करवाढीविरोधी आक्रमक होत सत्ताधारी भाजपाविरोधी जोरदार घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना सदस्यांनी तर पीठासनावरच बैठक मारली आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड गोंधळातच महापौरांनी महासभा संपल्याचे जाहीर करत विषयपत्रिकेवरील सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी महासभेवर करवाढीचा विषय नसताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल नापसंती व्यक्त केली.
नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीला दिलेल्या मंजुरीचे तीव्र पडसाद शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने करवाढीविरोधी आक्रमक होत सत्ताधारी भाजपाविरोधी जोरदार घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना सदस्यांनी तर पीठासनावरच बैठक मारली आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड गोंधळातच महापौरांनी महासभा संपल्याचे जाहीर करत विषयपत्रिकेवरील सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी महासभेवर करवाढीचा विषय नसताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल नापसंती व्यक्त केली. स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत पाच वर्षांत १२० टक्के करवाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. या प्रस्तावित करवाढीला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला. शनिवारी होणाºया महासभेत या करवाढीचे पडसाद उमटणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार, महासभेत शिवसेनेसह कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या टोप्या व गळ्यात काळा स्कार्प घालत प्रवेश केला त्याचवेळी विरोधकांचा आक्रमक पवित्रा दिसून आला होता. श्रद्धांजली व अभिनंदनाच्या प्रस्तावांचे वाचन झाल्यानंतर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी नगरसचिवांना करवाढीसंदर्भात दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची मागणी केली परंतु, महापौर रंजना भानसी यांनी करवाढीचा प्रस्तावच आजच्या महासभेवर नसल्याने पत्राचे वाचन करण्याची गरज नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाले. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या सदस्यांनी ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘करवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसणाºया भाजपाचा निषेध असो’ अशी घोषणाबाजी करत पीठासनाकडे धाव घेतली. महापौरांच्या पुढ्यात प्रचंड घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी विरोधकांना राजदंड वाचविण्यासाठी धावपळशिवसेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. अशातच अंगावर निषेधाचे पोस्टर घेऊन आलेल्या संतोष गायकवाड यांनी पीठासनावर उभे राहून थेट राजदंडालाच हात घातला. त्यानंतर अजय बोरस्ते, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, संतोष साळवे, सुधाकर बडगुजर यांनी राजदंड काढून पळविण्याचा प्रयत्न केला. या पळवापळवीत काही सदस्य पीठासनावरून खाली कोसळले. राजदंडाची सुरक्षा सांभाळणारे नाईक मुश्ताक शेख यांनी राजदंड पळविण्यापासून रोखले. त्यांच्या मदतीला सुरक्षारक्षकही धावले.विरोधकांचा गोंधळ अशोभनीय मुळात स्थायी समितीने केलेला ठरावच अद्याप महासभेवर आलेला नाही. जर महासभेवर करवाढीचा विषयच नव्हता तर सेनेने दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची गरजच नाही. ज्यावेळी स्थायी समितीचा ठराव येईल, तेव्हा चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधकांनी घातलेला गोंधळ हा अशोभनीय आहे.
- रंजना भानसी, महापौर