पक्ष्यांचा वाढतोय किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:06+5:302020-12-05T04:23:06+5:30

अभयारण्याच्या जलाशयावर पक्ष्यांचे थवे विहार करताना नजरेस पडू लागले आहेत. वृक्षांवर मार्श हॅरियर, ऑस्प्रे ईगलसारखे शिकारी पक्षी तसेच जलाशयावर ...

Growing chirping of birds | पक्ष्यांचा वाढतोय किलबिलाट

पक्ष्यांचा वाढतोय किलबिलाट

Next

अभयारण्याच्या जलाशयावर पक्ष्यांचे थवे विहार करताना नजरेस पडू लागले आहेत. वृक्षांवर मार्श हॅरियर, ऑस्प्रे ईगलसारखे शिकारी पक्षी तसेच जलाशयावर उघड्या चोचीचा करकोचा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, पट्टकादंब, स्पॉट बिल डक, गढवाल, चमचा, कमळपक्षी, शेकाट्या, नदी सुरय, लालसरी, तरंग, चक्रवाक, थापट्या, तलवार बदक, चक्रांग, भुवई, चित्रबलाक या पक्ष्यांचे थवे जलाशयावर बागडताना दिसून आले. चालू महिन्यात वाढत्या थंडीसह पक्ष्यांच्या प्रजातींमध्येही अधिक वाढ होण्याची शक्यता वन्यजीव सूत्रांनी वर्तविली आहे. सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, गाईड अमोल दराडे, गंगाधर अघाव, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, पंकज चव्हाण यांनी प्रगणनेत सहभाग घेतला.

-----

-इन्फो--

एकूण दहा हजार पक्षी

चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मधमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा एकूण सात ठिकाणांहून पक्षीनिरीक्षण करत प्रगणना करण्यात आली. एकूण ५६ प्रजातींचे ६ हजार ७१५ पाणपक्षी, ३ हजार ४८५ झाडांवरील व गवताळ भागातील पक्षी असे एकूण १० हजार २०० पक्षी आढळून आल्याचा दावा वन्यजीव विभागाकडून करण्यात आला आहे.

-----इन्फो-----

-कोरोनामुळे दुर्बीण सुविधा बंद

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य लॉकडाऊन काळापासून बंद ठेवण्यात आले होते. गेल्या २० तारखेपासून अभयारण्याचे दरवाजे पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. मात्र, कोविड-१९पासून बचावासाठी राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करणे पर्यटकांवर बंधनकारक केले आहे. तसेच पर्यटकांना वन्यजीव विभागाकडून पुरविली जाणारी दुर्बीण सुविधा कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे. पर्यटकांनी स्वत:च्या दुर्बीण व टेलिस्कोप वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

फोटो आर वर ०३ नांदूर१/२/३

Web Title: Growing chirping of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.