रस्त्यावर वाढतोय भाजी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:14+5:302021-02-09T04:17:14+5:30
रस्त्यावरील ढापे धोकादायक स्थितीत नाशिक:शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीच्या ढाप्याचा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर असलेल्या या ...
रस्त्यावरील ढापे धोकादायक स्थितीत
नाशिक:शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीच्या ढाप्याचा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर असलेल्या या ढाप्याच्या कडेच्या बाजूचे सिमेंट उखडल्यामुळे खड्डा निर्माण होत आहे. रस्त्यावर वेगाने जाणारी वाहने अशा खड्ड्यात आदळत असून अनेकदा दुचाकी चालकाचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता असते.
रस्ता बंद केल्याने वाहनधारकांची तारांबळ
नाशिक: अशोकस्तंभ येथील जनावरांच्या दवाखान्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे कोंडीची समस्या सोडविण्यासाठी बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद करण्यात आला असला तरी पुढे जाऊन वळसा घेणाऱ्या वाहनांमुळे देखील मुख्य रस्त्यावर वाहनांची कोंडी होत असते.
रस्त्यावरील वाहनांमुळे अडथळा
नाशिक: जिल्हा परिषदेच्या मार्गावर उभ्या राहाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक चारकाची, दुचाकी उभ्या केल्या जातात. शासकीय कामे तसेच बँकामध्ये जाणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. इमारतीच्या पार्किंग आवारात जागा असतांनाही त्याचा वापर केला जात नसल्याचे दिसते.
उपनगर-लोखंडमळा मार्ग खडतर
नाशिक: उपनगर कॉलनीकडून लेाखंडेमळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सिंधी कॉलनी मार्ग तसेच महारुद्र कॉलनी मार्गापर्यत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर खाेदकाम करण्यात आल्यानंतर खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सिग्नल बंद असल्याचे वाहनधारकांचा गोंधळ
नाशिक: पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्याजवळील चौकातील सिग्नल बंद पडल्याने सोमवारी सायंकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सिग्नल बंद पडल्यानंतर वाहतूक पोलीस देखील चौाकात हजर होते. मात्र वाहतूक नियंत्रित केली जात नसल्याने वाहतुकीची काेंडी झाली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती.