उगवली शुक्राची चांदणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:12 AM2017-10-23T00:12:02+5:302017-10-23T00:12:07+5:30

‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’, ‘वाºयावरती गंध पसरला’, ‘हृदयात वाजे समथिंग’ या आणि अशा अनेकविध गाण्यांची उधळण शनिवारी (दि. २१) भाभानगर येथे आयोजित भाऊबीज पाडवा कार्यक्रमात करण्यात आले. सारेगमप फे म तसेच ती सध्या काय करते फेम आर्या आंबेकर हिची विशेष उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.

Grown apex awning ... | उगवली शुक्राची चांदणी...

उगवली शुक्राची चांदणी...

Next

नाशिक : ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’, ‘वाºयावरती गंध पसरला’, ‘हृदयात वाजे समथिंग’ या आणि अशा अनेकविध गाण्यांची उधळण शनिवारी (दि. २१) भाभानगर येथे आयोजित भाऊबीज पाडवा कार्यक्रमात करण्यात आले. सारेगमप फे म तसेच ती सध्या काय करते फेम आर्या आंबेकर हिची विशेष उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.  या संगीत मैफलीची सुरुवात ‘प्रथम तुला वंदितो’ या गणेश स्तवनाने झाली. यानंतर ‘सूर निरागस हो’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘चांगभलं ज्योतिबाच्या नावाने चांगभलं’ आदी गीतांचे गीतकार संजय गिते, निषाद गिते, अश्विनी सरदेशमुख यांनी सादर केले.  या कार्यक्रमादरम्यान जयेश भालेराव (की बोर्ड), फारूक पिरजादे (ढोलकी), अभिजीत वैद्य (तबला) यांनी साथसंगत केली तर श्रीपाद कोतवाल यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. युवक मित्रमंडळ मुंबई नाका आयोजित या कार्यक्रमास वसंत गिते, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक अर्चना थोरात, सुमन भालेराव यांच्यासह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रपटातील अनुभव कथन
संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना आर्या आंबेकर हिने ती सध्या काय करते या चित्रपटातील अनुभव उपस्थितांसमोर मांडताना ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘सजन दारी उभा गं’, ‘लग जा गले’ अशी वैविध्यपूर्ण गीते सादर करत रसिकांची मने जिंकली तर ‘उगवली शुक्राची चांदणी’ या गीताला रसिकांनी विशेष दाद दिली.

Web Title: Grown apex awning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.