जिल्ह्यासह शहरातील वाढ चारशेपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:29+5:302021-05-28T04:12:29+5:30

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २७) नवीन ७२८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये ...

The growth in the city, including the district, is less than four hundred | जिल्ह्यासह शहरातील वाढ चारशेपेक्षा कमी

जिल्ह्यासह शहरातील वाढ चारशेपेक्षा कमी

Next

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २७) नवीन ७२८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये नाशिक शहरातील ३२५ आणि ग्रामीणच्या ३९७ नागरिकांचा समावेश आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुमारे दीडपट असली तरी जिल्ह्यात ३६ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५५०वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १३,९७२ वर पोहोचली आहे. नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४६८, तर नाशिक ग्रामीणला ४६५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २२ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २५, ग्रामीणला २१ असा एकूण ४६ जणांचा बळी गेला आहे.

इन्फो

उपचारार्थी १४ हजारांहून कमी

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९ मार्चनंतर आताच १४ हजारांहून कमीच्या पातळीवर आली आहे. तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर उपचारार्थींची रुग्णसंख्या १३,९७२ या पातळीपर्यंत कमी झाली आहे. त्यात ५८७९ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ७१०६ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, तर ९८७ रुग्ण मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत.

Web Title: The growth in the city, including the district, is less than four hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.