शहरात वाढला उकाडा; पारा ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:15 PM2019-06-22T19:15:58+5:302019-06-22T19:18:51+5:30

नाशिक : शहराचे तापमान मागील चार दिवसांपासून पुन्हा तीशीपार सरकत असून शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशावर पोहचल्याची नोंद ...

Growth in the city; Mercury at 35 degrees | शहरात वाढला उकाडा; पारा ३५ अंशावर

शहरात वाढला उकाडा; पारा ३५ अंशावर

Next
ठळक मुद्देनाशिककर पुन्हा घामाघुम होताना दिसत आहे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल

नाशिक : शहराचे तापमान मागील चार दिवसांपासून पुन्हा तीशीपार सरकत असून शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशावर पोहचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरूवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघुम होताना दिसत आहे.
जून महिना सरत आला असून अखेरचा आठवड्याला प्रारंभ झााला आहे; मात्र अद्याप पावसाला समाधानकारक अशी सुरूवात होऊ शकलेली नाही. परिणामी शहराच्या वातावरणात पुन्हा उष्णता वाढताना अनुभवयास येत आहे. पारा ३५ अंशाच्या पुढे सरकत असल्याने वातावरणात दमटपणा जाणवू लागला असून नाशिककरांना उकाड्याचा त्रास जूनच्या अखेरीसही सहन करावा लागत आहे. यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. ‘वायू’वादळामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आणि अचानकपणे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला.
गुरूवारी (दि.२०) मान्सूनने कोकणातून राज्यात प्रवेश केला. यावर्षी पावसाने राज्यात उशिराने वर्दी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शीगेला पोहचली असून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल झाले असून चिंतेचे वातावरण व्यक्त केले जात आहे. जूनअखेरीस पावसाला सुरूवात होणे अपेक्षित होते; मात्र अद्याप तशी स्थिती निर्माण होऊ न शकल्यामुळे वातावरणात उष्मा टिकून आहे. जूनच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाने तीशी ओलांडली आहे. तसेच किमान तापमानदेखील वीशीच्या पुढे सरकले आहे. ३१ अंशावरून कमाल तापमान थेट ३५अंशाच्यापुढे गेले आहे.

Web Title: Growth in the city; Mercury at 35 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.