पोळ लाल कांद्याची आवक वाढली

By admin | Published: January 22, 2017 11:47 PM2017-01-22T23:47:16+5:302017-01-22T23:47:36+5:30

येवला : बाजरी, गव्हाची आवक घटली

The growth of the podal red onion increased | पोळ लाल कांद्याची आवक वाढली

पोळ लाल कांद्याची आवक वाढली

Next

येवला : गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डमध्ये नवीन पोळ लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून, बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक आदि राज्यांत व परदेशातही दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर आदि ठिकाणी कांद्याला सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात कांद्याची एकूण आवक ११०७२६ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ३०० ते ६२० रुपये, तर सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण ६२८०० क्विंटल आवक झाली असून, बाजारभाव किमान २७५ ते ६२६ रुपये, तर सरासरी ५२५ रुपये प्रतिक्विंटल होते.  गहू : सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण १९ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १६०१ ते १९०२ रुपये, तर सरासरी १८७० रुपये प्रतिक्विंटल होते.  तूर : सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली. व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची एकूण ३२ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान ३७४५ ते ४१२० रुपये होते, तर सरासरी ३९५७ रुपयेपर्यंत होते. सोयाबीन : सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण ७३ क्विंटल आवक झाली असून, बाजारभाव किमान २६५१ ते २८८८ रुपये, तर सरासरी २८५१ रुपयेपर्यंत होते. मका : सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली. सप्ताहात मक्याची एकूण १२४३२ क्विंटल आवक झाली असून, बाजारभाव किमान १२७६ ते १३३९ रुपये, तर सरासरी १३२५ रुपयेपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार यांनी दिली. (वार्ताहर )

Web Title: The growth of the podal red onion increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.