डाळिंबाची लाली वाढली, भावात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:37 PM2018-09-12T13:37:29+5:302018-09-12T13:37:42+5:30

सटाणा : डाळिंबाची भावात अचानक लाली वाढली आहे.येथील बाजार समितीत भगव्या डाळिंबाची आवक घातल्याने किलोमागे दुपटीने भाव वाढले आहे.

 Growth of pomegranate increased, the price doubled | डाळिंबाची लाली वाढली, भावात दुपटीने वाढ

डाळिंबाची लाली वाढली, भावात दुपटीने वाढ

googlenewsNext

सटाणा : डाळिंबाची भावात अचानक लाली वाढली आहे.येथील बाजार समितीत भगव्या डाळिंबाची आवक घातल्याने किलोमागे दुपटीने भाव वाढले आहे.दोन दिवसांपूर्वी ३० रु पये किलोने विक्र ी झालेल्या डाळींब सर्वाधिक ६० रु पये किलोने विक्री झाला. येथील बाजार समतिी आवारात डाळिंबाच्या आवकेत घट होत असून गेल्या आठवड्यात दररोज पाचशे क्र ेट्सच्या आवकेत घट होत होती. मंगळवारी २९९५ क्र ेट्स इतकी आवक होती .त्यामुळे भावात अचानक दुपटीने भाव वाढले. गेल्या महिनाभरापासून चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला ३० ते ३२ रु पये प्रतिकिलोचा दर मिळत होते.आगामी काळात डाळिंबाचे दर चढेच राहण्याची शक्यता येथील प्रसिद्ध डाळिंब व्यापारी भैय्या रौंदळ यांनी व्यक्त केली आहे.सटाणा बाजार समितीसह इतर ठिकाणी डाळिंबाच्या आवकेत गेल्या सोमवारपासून तीस टक्के घट झाली.बिहार ,पश्चिम बंगालमध्ये अचानक मागणी वाढल्याने ही अनपेक्षित भाववाढ झाल्याचे डाळिंब व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महिनाअखेर डाळिंबाचा दर पन्नाशी ओलांडेल असा अंदाजदेखील रौंदळ यांनी व्यक्त केला आहे. महिनाभरापासून सटाणा बाजार समितीत सरासरी सहा ते सात हजार क्र ेट्स इतकी आवक होती.आवक अचानक मंदावल्याने ही भाववाढ झाली असून ३० ते ३५ रु पये शिवार खरेदी केल्याने शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला आहे. कधीकाळी डाळिंबाचे आगर असलेल्या कसमादेमध्ये तेल्याने घाला घातल्याने सद्यस्थितीत नगर जिल्हा डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहे. नगर परिसरातून नाशिक बाजार समितीत होणाºया डाळींबाच्या आवकेत देखील मोठी तुट निर्माण झाल्याने व बाहेरील राज्यात मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

Web Title:  Growth of pomegranate increased, the price doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक