रहिवाशांच्या काळजात वाढतेय ‘धडधड’

By admin | Published: September 20, 2015 11:59 PM2015-09-20T23:59:06+5:302015-09-21T00:01:36+5:30

संततधार पाऊस : गढीवरील घरे कोसळल्याने पुन्हा भीतीचे सावट

Growth of the residents 'staggering' | रहिवाशांच्या काळजात वाढतेय ‘धडधड’

रहिवाशांच्या काळजात वाढतेय ‘धडधड’

Next

नाशिक : शुक्रवारी पहाटेपासून शहरात सुरू झालेला संततधार पाऊस अन् धोकादायक काझीच्या गढीची ढासळणारी माती. यामुळे शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गढीवरील दोन घरे पुन्हा कोसळल्याची दुर्घटना घडली अन् रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाच्या संततधारेने गढीच्या रहिवाशांची धडधड वाढली आहे.
नदीकाठाला लागून असलेली शेकडो वर्षे जुनी काझीची गढी अत्यंत धोकादायक झाली आहे. सन २०१३ मध्ये २१ तर गेल्या वर्षी पावसाळ्यात चार ते पाच घरे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. यावर्षी पुन्हा दोन घरे कोसळली. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी टळल्याने अद्याप प्रशासन अडचणीत आलेले नाही; मात्र गढीचे संकट वेळीच ओळखणे गरजेचे असून, उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Growth of the residents 'staggering'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.