नाशिकरोड परिसरातील ग्रामीण भागात चोऱ्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:11 AM2019-05-18T00:11:12+5:302019-05-18T00:12:29+5:30
नाशिकरोड जवळील ग्रामीण गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, नाशिकरोड पोलिसांसमोर चोराच्या टोळ्यांचे मुसक्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड जवळील ग्रामीण गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, नाशिकरोड पोलिसांसमोर चोराच्या टोळ्यांचे मुसक्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखोरी, बाभळेश्वर, चेहेडी, सामनगावरोड या भागात गेल्या पंधरा दिवसांत तीन-चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. उकाड्यामुळे ग्रामस्थ घराबाहेर झोपले असल्याने चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा किंवा दरवाजाची आतील कडी उघडून घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. ग्रामीण गावांमध्ये चोरट्यांनी आपले लक्ष्य केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. सामनगाव वृद्धाश्रमाजवळ राहाणारे तानाजी रुंजा ढोकणे यांचे कुटुंबाचे सदस्य गुरूवारी रात्री घरात, गच्चीवर व बाहेर ओट्यावर झोपी गेले होते. बाहेरून घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप-कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचे २० तोळ्याचे दागिने चोरून नेले. ढोकणे यांच्या कुटुंबाच्या चोरी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उठल्यानंतर लक्षात आली.
पोलिसांसमोर आव्हान
ग्रामीण भागात दाट लोकवस्ती बरोबर विखुरलेले व मळ्यत एकटी घरे आहेत. मात्र चोरटे परिसराची पूर्ण माहिती व रेकी करून चोरी यशस्वीपणे करत असल्याने चोरट्यांचा गावात दिवसा वावर असण्याची दाट शक्यता आहे. नदी पात्रातील वाळू काढण्यासाठी शेती व इतर कामासाठी बाहेरून मजूर, कामगार आले आहेत. तसेच पोलिसांची गस्त म्हणावी तशी पुरी पडत नसल्याने चोºयांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीर भागाला लक्ष्य करून चोºया करणाºया चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान नाशिकरोड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.