ओझरच्या दोन टेक्सटाईल मार्केटवर जीएसटीच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 00:55 IST2021-10-07T00:55:30+5:302021-10-07T00:55:49+5:30
होलसेल टेक्सटाईल मार्केट क्षेत्रात ओझर हे कमी कालावधीत नावारुपास आल्यानंतर येथील घरगुती दुकानदार व व्यापाऱ्यांची वर्दळ सातत्याने होऊ लागली आहे. अशातच आगामी सण, उत्सव बघता ही गर्दी दुपटीने वाढत असताना घटस्थापनेच्या आदल्या दिवशी ओझरमधील दोन टेक्सटाईल मार्केटवर वस्तू व सेवा कर विभागाने धाडी टाकत कसून तपासणी केल्याचे समजते.

ओझरच्या दोन टेक्सटाईल मार्केटवर जीएसटीच्या धाडी
ओझर : होलसेल टेक्सटाईल मार्केट क्षेत्रात ओझर हे कमी कालावधीत नावारुपास आल्यानंतर येथील घरगुती दुकानदार व व्यापाऱ्यांची वर्दळ सातत्याने होऊ लागली आहे. अशातच आगामी सण, उत्सव बघता ही गर्दी दुपटीने वाढत असताना घटस्थापनेच्या आदल्या दिवशी ओझरमधील दोन टेक्सटाईल मार्केटवर वस्तू व सेवा कर विभागाने धाडी टाकत कसून तपासणी केल्याचे समजते.
एकाच वेळी दोन्ही ठिकाणी टाकलेल्या धाडीत नेमके काय निष्पन्न झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.
दिवसभर चाललेल्या तपासणीत अधिकाऱ्यांनीदेखील कमालीची गुप्तता पाळण्याचे धोरण अवलंबिले गेले आहे. आधीच मागील दोन लॉकडाऊनमुळे व्यापारी पेठा ठप्प असताना आता कुठे विक्रीचा जम बसू लागला असताना या प्रकरणांमुळे मानसिकदृष्ट्या भीतीचे वातावरण पसरले असल्याची भावना व्यापारीवर्गाने बाेलून दाखविली. एकंदरीत हे धाड सत्र होते की तपासणी हे अद्याप कळले नसले तरी याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली आहे.