साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:42 PM2021-01-25T16:42:22+5:302021-01-25T16:45:46+5:30
नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली.
नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली.
नाशिक शहरात होणाऱ्या या संमेलनाच्या स्वागत समितीच्या उपाध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बरोबरच गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डाॅ. मो. स. गोसावी,प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीवर नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सल्लागार प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या निमंत्रणापासून नाशिकला संमेलन घेऊन येण्यात सर्वाधिक मोलाचे योगदान असलेले लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची संमेलनाच्या कार्यवाहपदी, तर विश्वस्त हेमंत टकले यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षांना सल्लागार म्हणून सहकार्याध्यक्षपदावर ॲड. विलास लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सर्व समित्यांचे समन्वयक म्हणून विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नितीन मुंडावरे यांची साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामकाजासाठी विशेष नियुक्ती करण्यात आल्याचेदेखील टकले यांनी नमूद केले.