पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर, गहू अन् द्राक्ष बागेची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:29 PM2023-03-10T15:29:36+5:302023-03-10T15:30:02+5:30
मंत्री महोदयांनी चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले व गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागाची पाहणी केली
चांदोरी (नाशिक) : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच, फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असून द्राक्ष बागायदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज (दि. 10 मार्च) चांदोरी येथील द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच गहू पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
मंत्री महोदयांनी चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले व गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागाची पाहणी केली तसेच बाळासाहेब घोरपडे यांच्या गव्हाच्या शेताची पाहणी केली. संबंधीत अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे शेतकऱ्यांना आश्र्वासित केले. यावेळी कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, प्रांताधिकारी अर्चना पठारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.