येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:52 PM2018-01-15T23:52:36+5:302018-01-15T23:55:40+5:30

येवला : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यात समीर समदडीया या कार्यकर्त्याच्या गच्चीवरून पतंग उडवण्याची मजा घेतली. पालकमंत्री यांनी येवल्यात पतंगाचा दोर आणि आसारी यंदा चांगलीच घट्ट धरीत सव्वाचा पतंग उडवला.

Guardian minister kite flying in Yeola | येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी

येवल्यात पालकमंत्र्यांची पतंगबाजी

Next

येवला : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यात समीर समदडीया या कार्यकर्त्याच्या गच्चीवरून पतंग उडवण्याची मजा घेतली. पालकमंत्री यांनी येवल्यात पतंगाचा दोर आणि आसारी यंदा चांगलीच घट्ट धरीत सव्वाचा पतंग उडवला.
हवादेखील चांगली असल्याने पतंग आकाशात उंच गेला. बराच काळ पतंग हवेत होता. चार दोन पतंगही त्यांनी कापल्या. पतंगातील पेच चांगलाच रंगला. राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्चितच वरचढ आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पतंगापुढे कुठलाही पतंग उडू शकत नाही, सगळ्यांच्या पतंगाची दोरी आम्ही कापलेली आहे. सध्या भाजपाचा मांजा जोरात असून दुसºया कोणाकडेच आमच्यासारखा मांजा नाही असे म्हणत गिरिश महाजन यांनी येवल्यातील प्रसिध्द पतंगोत्सवाला हजेरी लावून जोरदार पतंगबाजी केली. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नरेंद्र दराडे, सुहास कांदे यांनीही पतंगबाजीचा आनंद लुटला. यानंतर पालकमंत्री महाजन यांनी नगरसेवक प्रमोद सस्कर व बंड़ू क्ष्ीारसागर यांच्या निवासस्थानी हजेरी लावीत पतंगोत्सवाचा आनंद लुटला.

यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पतंग उडवले. यावेळी भाजपचे बाबासाहेब डमाळे, शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजू परदेशी , गोरख खैरनार, मनोज दिवटे , दिनेश परदेशी, मातोश्री शिक्षण संस्थेचे कुणाल दराडे, गणेश खळेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक भाजपा युवा नेते समीर समदडीया यांच्या तातडीच्या निमंत्रणावरून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यातील पतंगोत्सवात हजेरी लावली. सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान पालकमंत्री महाजन यांचे समिर समदडीया यांचे घरी आगमने झाले . पतंगबाजीचा आनंद लुटण्यासाठी, येवलेकरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्याची पतंग कट्टर पतंगबाज असलेल्या येवलेकरांनी दोन तीन वेळेस कापली. पालकमंत्री महाजन यांनी हा खेळाचाच भाग असून या पतंगाकडे तुम्ही लक्ष देऊ नका राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्चितच वरचढ आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: Guardian minister kite flying in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक