संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभावासाठी पालकमंत्री, खासदारांना शेतकऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:44 PM2018-05-27T15:44:18+5:302018-05-27T15:44:18+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुस:या टप्प्यात रविवारी (दि.27) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपूरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली.
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुस:या टप्प्यात रविवारी (दि.27) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपूरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली. या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा अधिकार 2017 आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके संसदेत सादर केली जाणार असून या विधेयकांना पाठींबा देण्याचे आवाहनही नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने यावेळी केले आहे.
नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या माध्यामातून विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. परंतु गिरीश महाजन कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या स्विय सहायकांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले .त्यानंतर दुपारी आंदोलन समितीने खासदार हरीचंद्र चव्हाण यांच्या नाशिक शहरातील निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन करीत त्यांना निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार्पयत पोहोचवून त्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. परंतु, गोडसे कार्यालयात नसल्याने आंदोलकांना सुरारे तासभर गोडसे यांची प्रतिक्षा करावी लागली. गोडसे कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्याची मागणी केली. त्यावर गोडसे यांनी शेतक:यांच्या मागण्या रास्त असून संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी कें द्र स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी सत्याग्राचा समारोप केला. या सत्याग्रह आंदोलनात महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती सेना,भारतीय साम्राज्य संघटना, बळीराजा प्रतिष्ठान, मराठा क्र ांती मोर्चाच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेत शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली.