चारा छावणीच्या अनामतीबाबत पालक सचिव अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:03 AM2019-05-18T01:03:26+5:302019-05-18T01:03:47+5:30

दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या.

 Guardian secretary unaware of the filling of the fodder camp | चारा छावणीच्या अनामतीबाबत पालक सचिव अनभिज्ञ

चारा छावणीच्या अनामतीबाबत पालक सचिव अनभिज्ञ

Next

नाशिक : दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नसताना, छावणीसाठी शासनाने दहा लाखांच्या अनामत रक्कम निश्चितच केली नसल्याचा धक्कादायक खुलासा पालक सचिव सीताराम कुंटे यांनी करून एक प्रकारे चारा छावण्या सुरू न होण्यामागे जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचे सूचित केले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचे सांगणाऱ्या कुंटे यांनी मात्र त्यावर मात करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सांगितली नाही.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करून शुक्रवारी कुंटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या सिन्नर तालुक्यातील दौºयात आलेले अनुभव कथन करतानाच, जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ंबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्णात चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्याने सात छावण्या सुरू होतील, असे सांगितले. त्यावर चारा छावण्यांसाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम शासनाने ठरविलेली नसल्याचे त्यांनी सांगतात, ही रक्कम कोणी ठरविली, असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी चारा, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोडिंग आदी व्यवस्था छावणीत करावी लागणार असल्यामुळेच ही रक्कम निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. परंतु जादा अनामत ठेवल्यामुळे चारा छावण्या सुरू होत नसल्याच्या वृत्ताचे कुंटे यांनी खंडण केले. जिल्ह्णात किती पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली यावर कुंटे यांना माहिती देता आली नाही, मात्र जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती पाहता, शासनाने ९३० गावांमध्ये टंचाई घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. या टंचाईग्रस्त गावांमध्ये भविष्यात टंचाई भासू नये यावर ठोस उपाययोजना काय असे विचारले असता, त्याचे उत्तर देण्याचे टाळण्यात आले, मात्र टंचाई कृती आराखड्याचे दोन टप्पे संपुष्टात येऊनही प्रशासनाकडून निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याच्या प्रश्नावर सारेच निरुत्तर झाले. टंचाई कृती आराखड्याच्या आधारे टंचाईच्या उपाययोजना केल्या जात असताना जिल्ह्यातील काही वाड्या, वस्त्यांमध्ये महिलांना धोकेदायक विहिरीत उतरून पाणी का भरावे लागते या प्रश्नावरही प्रशासनातील अधिकाºयांनी मौन पाळले. जिल्ह्णात रोजगार हमी योजनेचे एक हजार कामे सुरू असून, त्यावर ४० हजार मजूर काम करीत असल्याचे तसेच सेल्फवर सोळा हजार कामे असल्याचे कुंटे यांनी यावेळी सांगितले.
यंदा कांद्याचे उत्पादन घटणार
पालक सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकाºयांच्या घेतलेल्या आढावा बैठकीचा हवाला देत, यंदा कांद्याच्या उत्पादनात जवळपास २५ टक्के फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली. पाण्याची कमतरता हेच कारण असून, त्याचा फटका उन्हाळी कांद्याला बसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फळबागा म्हणजेच द्राक्ष व डाळिंबाच्या बागा वाचविण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले असून, कृषी खात्याच्या मदतीने द्राक्ष व डाळिंबबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title:  Guardian secretary unaware of the filling of the fodder camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.