पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन १५ दिवस कायम ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:35 PM2018-08-07T14:35:45+5:302018-08-07T14:36:02+5:30
विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले.
विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. तत्संबंधीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाजन हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नाशिक दौºयावर आले असता भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली व निवेदन दिले.यावेळी महाजन यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. निवेदनात पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निफाड व येवला या दोन्ही तालुक्यांंमध्ये जेमतेम १५५ मि. मि.पावसाची नोंद झाली आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. त्याचबरोबर द्राक्षबागा,पेरू, डाळिंंब या फळबागा संकटात आल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यासर्व पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.सध्या पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्याचे सात दिवसाचे आवर्तन सुरु आहे. तेच आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवावे अशा मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे.या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, निफाड पंंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गोरे, निलेश सालकाडे, सोपान दरेकर, भारत कानडे,अमोल निकम, अरविंद पाटील, विलास पाटील आदींचा समावेश होता.