खामखेडा परिसरात साध्या पध्दतीने गुढीपाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:53 PM2019-04-06T18:53:45+5:302019-04-06T18:54:50+5:30
खामखेडा : चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती व शेतीमालाला भाव नसल्यामुळे गुढीपाडवा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
खामखेडा : चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती व शेतीमालाला भाव नसल्यामुळे गुढीपाडवा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांचा दृष्टीने गुढीपाडवा हा सण फार महत्वाचा असतो. कारण शेतकरी शेतीच्या मशागतीच्या मुहूर्त हे गुढीपाडवा सणाच्या दिवसापासून सुरवात करतो. या दिवशी सकाळी घरावर गुढी उभारून शेतात जाऊन बैलजोडीच्या साह्याने शेतात नागरीचा मुहूर्त करतो. तसेच गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करतो, मग त्यात शेतीसाठी ट्रॅक्टर, मोटरसायकल आणतो. किंवा नवीन घराच्या कामाचा शुभारंभ करतो.
पण चालू वर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. गतवर्षा पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. चालू वर्षी शेतात पिकविलेल्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्याचा दृष्टीने कांदा हे पीक फार महत्वाचे आहे. हमखास पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. म्हणून शेतकरी लाल, रागडा व उन्हाळी असे तीन हंगामात कांद्याची लागवड करतो.
ही परंतु लाल व रागडा कांद्याला भाव मिळाला नाही. सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम चालू असला तरी कांद्याला भाव नाही. तसेच टमाटे, कोबी, पिकाला हमीभाव मिळाला पिकांना भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयाची सर्वत्र कोंडी झाली असल्याने शेतकºयाच्या हाती पैसा नसल्याने गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर वस्तू खरेदीकडेही उत्साह दिसत नव्हता.