सिन्नरला गुढीपाडवा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:15+5:302021-04-14T04:13:15+5:30
---------------------- बॅनरमुळे सिन्नर शहर विद्रूप सिन्नर : शहरासह मुख्य चौक, बसस्थानक, रस्त्याच्या मधोमध आदींसह विविध भागात मोठ्या प्रमाणात ...
----------------------
बॅनरमुळे सिन्नर शहर विद्रूप
सिन्नर : शहरासह मुख्य चौक, बसस्थानक, रस्त्याच्या मधोमध आदींसह विविध भागात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे बॅनर लावण्यात आल्याने शहर विद्रूप झाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेची रितसर परवानगी न घेता अनेक जण स्वत:सह मित्रमंडळींची जाहिरात करीत आहेत. अशा फुकट्या जाहिरातदारांमुळे मात्र शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे दिसून येते. स्थानिक प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन फलक लावण्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
----------------------
सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कामाला वेग
सिन्नर : सिन्नर-शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाने वेग घेतला आहे. मुंबईसह उपनगरातील भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डीला येत असतात. त्यामुळे या महामार्गाने मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या मार्गावर पायी जाणाऱ्या पदयात्रेकरूंसाठी पालखी मार्ग असणार आहे. या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
--------------------
वावी बसस्थानकाचे काम रखडले
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील बसस्थानकाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. बसस्थानक उभे राहिले असले तरी बसस्थानकाचा तळ अद्याप कॉंक्रीटीकरण करणे बाकी आहे. बसस्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून बनविण्यात आलेल्या बसस्थानकाचे काम रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
-------------------
महागाईच्या तडाख्याने गृहिणी बेजार
सिन्नर : किराणा मालासह खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणी बेजार आहेत. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात असला तरी या आठवड्यात खाद्यतेल तब्बल २५ टक्क्यांनी महागले आहे. प्रतिकिलो १२५ रुपयांवरून थेट १५० रुपयांच्या घरात तेलाची किंमत गेल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाज्यांना महागाईच्या तेलाचा तडका द्यावा लागत आहे.