अतिथी उद्गारतात, ‘वाह...नाशिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:25 AM2018-03-01T01:25:31+5:302018-03-01T01:25:31+5:30

नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे.

Guests say, 'Wow ... Nashik'! | अतिथी उद्गारतात, ‘वाह...नाशिक’!

अतिथी उद्गारतात, ‘वाह...नाशिक’!

Next

नाशिक : नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मधोमध हिरवाई बहरल्याचे चित्र पहावयास मिळते. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभल्याने सौंदर्य खुलले आहे. य्मुळे उड्डाणपुलाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. केवळ सुशोभिकरणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव म्हणून त्यांचे आकर्षक रेखाटलेल्या छायाचित्रांपासून तर रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ, बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरून शहरात येणाºया पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच लाभलेले हिरवाईचे कोंदण आणि भिंतींसह खांबांवरील चित्राकृती बघून पाहुण्यांच्या मुखातून ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार सहज बाहेर पडतात.
उड्डाणपुलाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून लक्ष वेधून घेत आहे. विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहेत. तसेच उड्डाणपुलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत. नाशिकच्या उड्डाणपुलाखाली करण्यात आलेले सौंदर्यीकरण अन्य शहरांमधील उड्डाणपुलासाठीदेखील आदर्श ठरणारे आहे.

Web Title: Guests say, 'Wow ... Nashik'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.