गुग्गुळ ७००, लाख २०३ तर मोहफूल १७ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:45 AM2020-12-28T00:45:26+5:302020-12-28T00:45:51+5:30

आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रथान वन धन योजनेंतर्गत जंगलात मिळणाऱ्या विविध  गौणवन उपज  आदिवासींच्या बचटगटांमार्फत गोळा करून वनधन केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करून विक्री करण्यात येणार आहे. 

Guggul 700, lakh 203 and Mohful 17 rupees per kg | गुग्गुळ ७००, लाख २०३ तर मोहफूल १७ रुपये किलो

गुग्गुळ ७००, लाख २०३ तर मोहफूल १७ रुपये किलो

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासींना रोजगार : जंगलातील गौणवन उपजांनाही मिळतोय हमीभाव

नाशिक :  आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रथान वन धन योजनेंतर्गत जंगलात मिळणाऱ्या विविध  गौणवन उपज  आदिवासींच्या बचटगटांमार्फत गोळा करून वनधन केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करून विक्री करण्यात येणार आहे. 
यासाठी शासनाने जंगलात मिळणाऱ्या विविध गौणवन उपजांचा हमीभाव निश्चित केला आहे. त्यानुसार, गुग्गुळ  ७०० लाख (कुसुमी) २०३, वाळलेली मोहफुले १७ रुपये, तर हिरडा १५ रुपये किलो दराने खरेदी केला जात आहे. भारतीय जनजाती सहकारी विपणन संघातर्फे (ट्रायफेड) वनधन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनानेही मान्यता दिली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्र व इतर क्षेत्रांमधील स्वयंसहायता गटातील सदस्यांमार्फत जंगलातील गौणवन उपज गोळा करून, त्यावर प्रक्रिया केल्यानंतर  त्याची विक्री करणे व वनोपज गोळा करणाऱ्या आदिवासी लाभार्थ्यांना नफा वाटणे अशी ही योजना असून, यासाठी वनधन केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रांमार्फतच ही सर्व कामे चालनार आहेत. यासाठी शासनाने विविध गौण उपजांचा हमीभाव निश्चित केला आहे. यामुळे कोणत्याही केंद्राला याच दराने संबंधितांना पैसे द्यावे लागणार आहेत. एकूण ४९ गौण उपजांची निवड करण्यात आली आहे. 

Web Title: Guggul 700, lakh 203 and Mohful 17 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.