देवळ्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
By admin | Published: October 21, 2016 01:22 AM2016-10-21T01:22:44+5:302016-10-21T01:23:27+5:30
राष्ट्रवादी : वाखारी, उमराणा, लोहोणेर परिसराचा आढावा
देवळा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक देवळा येथे घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
देवळा मर्चंट बँकेच्या सभागृहात सपन झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष पंडित निकम होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, प्रांतिक सदस्य योगेश अहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर, चिंतामण अहेर, राजेंद्र देवरे, नूतन अहेर, डॉ.संजय निकम, अनंत आहिरराव आदि उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट करीत आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या वाखारी गटातून विद्यमान पंचायत समिती सदस्य लीना योगेश अहेर, नूतन सुनील अहेर, डॉ. कविता संजय निकम तसेच लोहोणेर गटातून सरपंच जयवंता दीपक बच्छाव, खामखेडा येथील मंगला दिलीप शेवाळे, निंबोळा येथील मंगल दिलीप पाटील यांनी पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. वाखारी व लोहोणेर हे गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.
उमराणा गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून दहीवड येथील मोहिनी राजू आहिरे, उमराणे येथील रवि शिरसाठ, इॅश्वर मोरे आदि या गटातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. पंचायत समितीच्या उमराणे गणात सतीश ठाकरे, चंद्रकांत वाघ (सर्वसाधारण). लोहोणेर गणात मनीषा निकम (सर्वसाधारण स्त्री) व महालपाटणे गणात दिलीप पाटील (ना.मा. प्रवर्ग) निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.
यावेळी पंडित निकम, योगेश अहेर, सुनील अहेर, उमराणा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, प्रकाश गुंजाळ आदिंनी आपल्या विचारातून
पक्षाची भूमिका मांडली. देवळा तालुक्यात उमेदवारी देताना
पक्षासाठी योगदान देणाऱ्या एकनिष्ठ असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. रणधीर गुरुजी यांनी आभार मानले. (वार्ताहर)