धामणगावी शेतकऱ्यांच्या बांधावर ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:22+5:302021-08-18T04:20:22+5:30
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, गंभीरवाडी, अडसरे खुर्द, शेणित परिसरातील साकूर, पिंपळगाव डुकरा या गावांना तुषार सूर्यवंशी, तर पिंपळगाव मोर, धामणी, ...
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, गंभीरवाडी, अडसरे खुर्द, शेणित परिसरातील साकूर, पिंपळगाव डुकरा या गावांना तुषार सूर्यवंशी, तर पिंपळगाव मोर, धामणी, बेळगाव तऱ्हाळे, कवदरा, घोटी खुर्द, भरवीर येथे संदीप कडणोर, नांदगाव, लक्ष्मीनगर, कृष्णनगर येथे मनोज मोरे, भरवीर, पिंपळगाव घाडगा, निनावी, येथे सारिका रोकडे यांनी या भागातील शेतकऱ्यांना आज या पीक पाहणी ॲपविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करीत पीक पाहणीची नोंद स्वतःच कशी करायची, याविषयी मार्गदर्शन केले. यासाठी प्रत्येक गावातील २० तरुण शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना तलाठी सय्यद यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यावेळी देण्यात आली आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तलाठी तुषार सूर्यवंशी, सारिका रोकडे, मनोज मोरे, तानाजी बर्डे, सोमनाथ बर्थड, शिवाजी गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, पंचायत समितीच्या उपसभापती विमल गाढवे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस, विजयकुमार कर्डक, गंभीरवाडी ग्रामपंचायत सदस्य भोईर, संदीप जाधव, बाळासाहेब वारुंगसे, वैशाली जाधव, सरपंच संगीता जाधव, बाळू आवारी, सरपंच यादव सहाणे, पोपट जाधव, अनिल जाधव पोलीसपाटील आबाजी जाधव, विजय जाधव, राजाराम जाधव, सरला घारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
छायाचित्र- १७ धामणगाव१
धामणगाव परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणीसंदर्भात मार्गदर्शन करताना तलाठी के. जी. सय्यद व शेतकरी.
170821\17nsk_34_17082021_13.jpg
धामणगाव परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणीसंदर्भात मार्गदर्शन करतांना तलाठी के.जी.सय्यद व शेतकरी.