पिंपळे येथे कृषी परिसंवादात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 06:50 PM2019-06-05T18:50:53+5:302019-06-05T18:51:37+5:30
सिन्नर : उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत तालुक्यातील पिंपळे येथे शेतकरी परिसंवादामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांबद्दल शेतकऱ्यांसमवेत चर्चा सत्रात माहिती देण्यात आली.
सुधारित तंत्रज्ञान अवलंब करून शेती उत्पादन दुप्पट वाढ करण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाबद्द्ल माहिती देण्यात आली. कृषीविभागाचे पर्यवेक्षक डी. एस. कोते यांनी बीजप्रक्रिया व जमीन आरोग्य पत्रिका, पिकावरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसाय गटशेती, समुहशेती, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची दक्षता, किटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी व हाताळणी करताना घ्यावयाची काळजी तसेच प्रगतशील शेतक-याने वापरलेले तंत्रज्ञान शेतक-र्यांपर्यंत पोहोचवणे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेंद्रीय शेती, डाळिंबावरील तेल्या रोगाचे नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती शेतक-यांना देण्यात आली. कृषी सहाय्यक एन. एस. खांडेकर यानी पिकविमा योजना, कृषी यांत्रिकीकरण व औजारे याबद्दल माहिती दिली. सी. के. खेमनर यानी मागेल त्याला शेततळे व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सोमनाथ पानसरे, विठ्ठल घुगे भाऊसाहेब बिन्नर, हनुमान सदगीर यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी सरपंच व उपसरपंच आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.