बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:19 PM2021-02-08T18:19:20+5:302021-02-08T18:19:40+5:30
त्रंबकेश्वर : हरसूल येथे बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती व बांबूचे अनेक फायदे यावेळी सांगण्यात आले.
त्रंबकेश्वर : हरसूल येथे बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती व बांबूचे अनेक फायदे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. यावेळी भय्यासाहेब विसावे यांनी शेतकर्यांना बांबू लागवडीविषयी माहिती देऊन या योजनेसाठी केंद्र सरकार व कंपनी सहकार्य करणार असून, या प्रकल्पासाठी सरासरी चारशे एकरवर बांबू व गवत लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला हरसूलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच नितीन देवरगावकर, मनोहर चौधरी, बी किसान कंपनीचे शैलेश जैन, मंगळू निंबारे, मधुकर पखाने, वामण कपडे, नवसू खिरारी, गंगाराम लहारे, शंकर पाटील, शिवराम चौधरी, सरपंच भगवान बेंडकोळी, विठ्ठल मौळे, अरूण महाले उपस्थित होते.