खेड येथे शेतकऱ्यांना शेळीपालनसंदर्भात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:14 PM2020-09-14T23:14:59+5:302020-09-15T01:29:34+5:30

नांदूरवैद्य : आज शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळणे व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी शेळीपालन, गायी, म्हशी पाळणे आदी व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

Guidance to farmers on goat rearing at Khed | खेड येथे शेतकऱ्यांना शेळीपालनसंदर्भात मार्गदर्शन

इगतपुरी तालुक्यातील खेड येथे आयोजित शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात शेतकºयांना माहिती देताना चंद्रकांत खाडे, डॉ. देशमुख, डॉ. कांगणे, कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर आदी.

Next
ठळक मुद्देअनेक महत्त्वपूर्ण विषयांवर तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन

नांदूरवैद्य : आज शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळणे व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी शेळीपालन, गायी, म्हशी पाळणे आदी व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील चंद्रवेल खेड येथे शेतकºयांच्या उन्नतीसाठी शेळीपालन व्यवसायासंदर्भात अध्यक्ष चंद्रकांत खाडे यांच्यासह विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विश्वास, भांडवल, दूरदृष्टिकोन, गोपनीयता व सामाजिक बांधिलकी या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितच शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्यास फायदेशीर ठरेल असे मत अध्यक्ष चंद्रकांत खाडे यांनी व्यक्त केले. या शिबिरात शेळीपालन व्यवसायाविषयी विविध योजनांची माहिती, व्यवसायविषयक मार्गदर्शन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांना अनुकूल वातावरण, स्वच्छता, कर्जसुविधा, विमा संरक्षण, आॅनलाइन फॉर्म भरणे, जनावरांसाठी खाद्य व उपचारपद्धती, तसेच वन्यप्राणी असलेल्या ठिकाणी सहली आयोजित करणे आदी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. शेळीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. शेळीपालनाचे फायदे व त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याविषयी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ.नरवाडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. झाडे, पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त देशमुख, इगतपुरीचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. कांगणे, डॉ.कुलकर्णी, डॉ. सय्यद, तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तंवर, रणजित आंधळे, विवेक सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. या शिबिरात गोट फार्म प्रोड्यूसर कंपनीने शेळीपालन व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी कसा व किती उपयुक्त आहे यावर चर्चा घडवून आणली.
याप्रसंगी नामदेव जाधव, सचिव दत्तात्रय कुंदे, गेणू डगळे, अशोक भांगरे, चांगदेव गतीर, रोहिदास गोवर्धने, तानाजी किरवे, राजाराम गुळवे, समाधान कालेकर, रोशन दातीर, प्रवीण शिंदे, वैशाली कळसे, लक्ष्मी गतीर आदींसह तालुक्यातील शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
 

 

Web Title: Guidance to farmers on goat rearing at Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.