येवल्यात नैसर्गिक शेती विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:32 PM2020-10-27T18:32:39+5:302020-10-27T18:34:29+5:30
येवला : येथील बाजार समिती सभागृहात नैसर्गिक शेती या विषयावर शाश्वत शेती अभ्यासक प्रकाश जगताप यांचे व्याख्यान झाले.
Next
ठळक मुद्देअग्निहोत्राचे प्रात्याक्षिक करून दाखवले.
येवला : येथील बाजार समिती सभागृहात नैसर्गिक शेती या विषयावर शाश्वत शेती अभ्यासक प्रकाश जगताप यांचे व्याख्यान झाले. जगताप यांनी जमीन मशागत, शेतीनिविष्ठा, बी-बियाणे, तण नियंत्रण, कीड नियंत्रण, जलसंधारण आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून अग्निहोत्राचे प्रात्याक्षिक करून दाखवले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, गोदावरी कृषी कंपनीचे अध्यक्ष उत्तम बोरणारे, बाजार समिती सचिव कैलास व्यापारे, संचालक बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, वसंत पवार आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते. जगताप यांनी शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले.