खरिपाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:38 PM2021-05-29T22:38:33+5:302021-05-29T23:57:52+5:30

वरखेडा : यावर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीजप्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले.

Guidance to farmers for pre-kharif cultivation | खरिपाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दिंडोरी तालुका कृषी विभागाच्यावतीने खेडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून दिली. त्याप्रसंगी कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे व शेतकरी. 

Next
ठळक मुद्दे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वरखेडा : यावर्षी सोयाबीन बियाणांची कमतरता असल्याने बीजप्रक्रिया कशी करावी व घरचे घरी आपल्या बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयीचे दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची पेरणी करावी. बियाणास जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया, डाळवर्गीय पिकासाठी व एकदल वर्गीय पिकासाठी बीजप्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर दहा टक्के कमी करून खर्चात बचत करावी. शेतकऱ्यांना त्यांचे बांधावर खते कसे उपलब्ध करून घेता येईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर व सलग फळबाग लागवड, तसेच याच योजनेअंतर्गत शेततळे खोदकाम व प्लास्टिक अस्तरीकरण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, मंडळ कृषी अधिकारी डी. आर. नाठे, कृषी पर्यवेक्षक पी. बी. कनहोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात येत आहे.
 

Web Title: Guidance to farmers for pre-kharif cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.