मासिक पाळी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:01 PM2020-02-21T18:01:50+5:302020-02-21T18:02:06+5:30

सिन्नर : युवा मित्र व टाटा वॉटर मिशनच्यावतीने महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मिठसागरे येथील पी. बी कथले हायस्कूल आणि दोडी बुद्रुक येथील श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मासिक पाळी मुलगी वयात येतांना फक्त शरीराचा आकारच बदलत नाही तर शरीराच्या आतही बदल होतात.

Guidance on menstrual health and hygiene | मासिक पाळी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

मासिक पाळी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

googlenewsNext

सिन्नर : युवा मित्र व टाटा वॉटर मिशनच्यावतीने महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मिठसागरे येथील पी. बी कथले हायस्कूल आणि दोडी बुद्रुक येथील श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मासिक पाळी मुलगी वयात येतांना फक्त शरीराचा आकारच बदलत नाही तर शरीराच्या आतही बदल होतात. त्यातलाच सर्वात मोठा बदल म्हणजे मासिक पाळीची सुरु वात. या वयात अनेक स्वप्न, अनेक आशा उराशी बाळगून पुढे पुढे जाण्याची धडपड त्यांच्या मनात असते. मात्र, मासिक पाळी या शब्दामुळे मुलींवर अनेक बंधन येतात. मासिक पाळीबाबतच्या गैरसमजांमुळे मुली-महिलांमध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातून सुटका करण्यासाठी मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर सारा व आनंदी जीवन जगा असे आवाहन मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता प्रकल्पाच्या समन्वयक रूपल देशमुख यांनी केले.
मासिक पाळी हे शरीर दुऱ्या एका जीवाला जन्म देण्यासाठी परिपक्व झाले आहे याचा एक संकेत आहे. मात्र, मासिक पाळीबद्दल समाजात गैरसमजच अधिक आहेत. एकीकडे देव-धर्म, चालीरीती, रूढी परंपरा यांचा जबर पगडा व त्यामुळे महिलांना आनंदाच्या सणांपासून दूर ठेवले जाते. या काळात त्यांना पुरेसा आहार आणि आराम मिळत नाही.

Web Title: Guidance on menstrual health and hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.