दाभाडीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:12+5:302021-08-24T04:18:12+5:30
कृषी कन्या नूतन रवींद्र निकम यांनी शेतकऱ्यांना धान्याची काढणीपश्चात प्राथमिक प्रक्रिया, डाळनिर्मिती आणि तेलबियांपासून तेल काढणे तसेच याद्वारे त्यांचे ...
कृषी कन्या नूतन रवींद्र निकम यांनी शेतकऱ्यांना धान्याची काढणीपश्चात प्राथमिक प्रक्रिया, डाळनिर्मिती आणि तेलबियांपासून तेल काढणे तसेच याद्वारे त्यांचे मूल्यसंवर्धन करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा वापर, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने कृषीमालाची साठवणूक आणि पॅकेजिंग, मालाची गुणवत्ता टिकवून ठेवणे याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. तुरबटमठ, उपप्राचार्य डॉ. एस. ए. राउत, डॉ. पी. के. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्ही. अहिरे, डॉ. जी. एस. बनसोडे, प्रा. एस. व्ही. बागल, प्रा. एस. के. उदमले, विषय विशेषज्ञ प्रा. के. ई. शेवाळे, डॉ. पी. एच. सोनवणे, प्रा. डी. बी. मोहिते आणि प्रा. एस. एम. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.