नांदूरवैद्यला ई-पीक पाहणीसंदर्भात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:56+5:302021-08-19T04:17:56+5:30
ई-पीक पाहणी करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांना भैरवनाथ महाराज सभागृहात तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे ...
ई-पीक पाहणी करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांना भैरवनाथ महाराज सभागृहात तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे यांनी ई-पीक पाहणीविषयी मार्गदर्शन केले.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील भैरवनाथ महाराज सभागृहात सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती स्वतःच सरकारकडे नोंदवणे शक्य होणार असून, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे यावेळी तलाठी श्रीमती गांगुर्डे यांनी सांगितले. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी सुलभता येईल, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई व मदत देणेही शक्य होईल, असेही गांगुर्डे यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे, ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे, विकास कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष काशीनाथ तांबे, माजी उपसरपंच पोपटराव दिवटे, नितीन काजळे, दत्तू दिवटे, माजी उपसरपंच प्रवीण आवारी, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, राजू रोकडे, मारुती डोळस, माधव कर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- १८ नांदूरवैद्य इ क्रॉप
नांदूरवैद्य येथील भैरवनाथ महाराज सभागृहात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीविषयी मार्गदर्शन करताना तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे, समवेत ॲड. चंद्रसेन रोकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे व ग्रामस्थ.
180821\18nsk_15_18082021_13.jpg
फोटो- १८ नांदूरवैद्य इ क्रॉप