गर्भवती महिलांना पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:07+5:302021-09-03T04:15:07+5:30
शासनाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू केले असून त्या कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांसाठी गरोदरपणात घ्यावयाचा सकस व ...
शासनाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू केले असून त्या कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांसाठी गरोदरपणात घ्यावयाचा सकस व पौष्टिक आहार जनजागृती कार्यक्रम येथील एकलव्य आदिवासी अंगणवाडीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य रंजना पवार या होत्या. यावेळी गरोदर महिलांना गरोदरपणात भेंडी, कारले, कोबी, लिंबू, टोमॅटो, बटाटे, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, भोपळा, विविध फळे, मोड आलेले कडधान्य सेवन केल्यास त्यापासून मिळणारे जीवनसत्व गर्भवती महिला व होणाऱ्या बालकास किती महत्त्वाचे आहे, याविषयी अंगणवाडी सेविका आशा येशी, कल्पना देवरे, रंजना जाधव यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेखा जाधव, भरत देवरे, मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष संदीप देवरे, ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे, कडू पवार, अंगणवाडी मदतनीस सुनंदा देवरे, छाया पगारे आदी उपस्थित होते.
फोटो-
०२ उमराणे आहार
गर्भवती महिलांना पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन करताना अंगणवाडी सेविका आशा येशी, कल्पना देवरे व रंजना जाधव
020921\02nsk_41_02092021_13.jpg
०२ उमराणे आहार