दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 01:36 PM2020-03-15T13:36:18+5:302020-03-15T13:37:06+5:30
दिंडोरी - समग्र शिक्षा अभियान समावेशीत शिक्षण उपक्र म अंतर्गत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक व दिंडोरी पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यांर्थ्यांच्या पालकांसाठी तालुका स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा घोलप, केंद्रप्रमुख परशराम चौरे, रामदास धात्रक, दिनेश जगताप, ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी,विशेष शिक्षक समाधान दाते,पूर्णिमा दीक्षित, दीपक पाटील ,,रीना पवार,कल्पना गवळी,आदी उपस्थीत होते.
ठळक मुद्देपालकांनी दिव्यांगविद्यार्थ्यांच्यासर्वांगीण विकासासाठी सजग रहावे असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीचे विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले.दिंडोरी पंचायत समिती येथे पालक प्रशिक्षण प्रसंगी मार्गदर्शन करतांना क्षीरसागर यांनी आवाहन केले. प्रास्ताविक दिंडोर
समाधान दाते यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाº्या सोयी सुविधा पालक शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज ही वेगळी असून त्यावर काय काय उपाययोजना केल्या जातात हे स्पष्ट केले. विविध तपासणी बाबत माहिती सांगितली. बसपास ष्ठढ्ढष्ठ कार्ड विषयी सांगितली.
पूर्णिमा दीक्षित ,अश्विनी जाधव,रीना पवार यांनी पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
-