छात्रभारती प्रशिक्षण शिबिरात व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:15 AM2021-01-25T04:15:54+5:302021-01-25T04:15:54+5:30

नाशिक : व्यक्तिमत्त्व विकासाला संविधानाची जोड देत, संविधानिक व्यक्तिमत्त्व असलेला नागरिक सामाजिक जीवनातही विकास घडवू शकतो, तसेच संविधान ...

Guidance on personality development in Chhatrabharati training camp | छात्रभारती प्रशिक्षण शिबिरात व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन

छात्रभारती प्रशिक्षण शिबिरात व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन

Next

नाशिक : व्यक्तिमत्त्व विकासाला संविधानाची जोड देत, संविधानिक व्यक्तिमत्त्व असलेला नागरिक सामाजिक जीवनातही विकास घडवू शकतो, तसेच संविधान प्रचार व प्रसारक संदीप भावसार यांनी केले.

छात्रभारती नाशिकतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे, चिखलवाडी येथे १६ ते १९ जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी छात्रभारतीचे सभासद व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिबिराच्या उद्घाटन प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विलोभनीय शैलीत व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी आवश्यक असलेले संवाद कौशल्य, सामूहिक कार्य, समस्या निराकरण, नेतृत्वगुण, मोटिव्हेशन आणि वर्क अंडर प्रेशर यासारख्या जीवन कौशल्याचे आयुष्यातील महत्त्व पटवून दिले.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे नितीन मते उपस्थित होते. ॲड.दत्ता ढगे यांनी तिसऱ्या सत्रात व्यवसाय हा काळाची गरज असल्याचे सांगितले. लोकेश लाटे यांनी स्वतःतील विवेक जागृत ठेवण्याची व आयुष्याच्या टप्प्यात सदसदविवेकबुद्धीने भविष्यातील वाटचाल करण्याचा सल्ला दिला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पहाटे शिबिरार्थीना योगाचे महत्त्व पटवून देत योगाची विविध प्रात्याक्षिके केली. त्यानंतर श्रद्धा कापडणे हिने लिंगसमानता व बहुलिंगता या विषयावर बोलताना स्त्री आणि पुरुषांसोबातच बहुलिंगीनाही समतेचे स्थान देऊ, असा आशावाद व्यक्त केला. छात्रभारतीचे माजी राज्याध्यक्ष ॲड. अरुण दोंदे, कामगार नेते महादेव खुडे, मुकुंद दीक्षित, मिलिंद वाघ, उत्तम कांबळे, किरण मोहिते यांनीही विविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप सत्रात शिबिरार्थींनी चार दिवसाचे अनुभव कथन केले, यावेळी विचार मंचावर छात्रभारतीचे मार्गदर्शक ॲड.शरद कोकाटे, ॲड.प्रभाकर वायचळे यांच्यासह छात्रभारती नाशिक कार्यकारिणीतील सदाशिव गणगे श्रद्धा कापडणे, देविदास हजारे, निवृत्ती खेताडे, आम्रपाली वाकळे, साहील मनियार, वनिता जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(आरफोटो- २४छात्रभारती कॅम्प) छात्रभारती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सहभागी कार्यकर्ते व पदाधिकारी.

Web Title: Guidance on personality development in Chhatrabharati training camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.