जायगाव येथील शेतकऱ्यांना किड नियंत्रणाविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:34 PM2020-07-04T16:34:31+5:302020-07-04T16:36:57+5:30
ाायगाव : क्रूषी संजिवनी सप्तहा निमित्ताने तालुका क्रूषी विभागाच्या वतीने जायगाव येथिल शेतकर्यांना सोयाबीन व मका किड नियंत्रणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ाायगाव : क्रूषी संजिवनी सप्तहा निमित्ताने तालुका क्रूषी विभागाच्या वतीने जायगाव येथिल शेतकर्यांना सोयाबीन व मका किड नियंत्रणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जायगाव येथिल मारूती मंदिर परिसरात तालुका कृषी अधिकारी ए. एच. गागरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीरात शेतकर्यांना सोयाबीन, मका पिकावरील कीड नियंत्रण तसेच फळबाग लागवड विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डाळींब, सिताफळ, चंदनशेती, फळबाग लागवड व नियोजन तसेच मार्केटींग आदी बाबत उपस्थित शेतकर्यांना क्रूषी सहाय्यक सचिन भगत यांनी मार्गदर्शन केले. तालुका क्रूषी अधिकारी गागरे यांनी पीक विमा योजना गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने बाबतीत मार्गदर्शन केले. फाऊसाहेब फुंडकर फळलागवड, उन्नत शेती. सम्रुध्द शेतकरी आदी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मंडल कृषी अधिकारी एम. आर. विठेकर सरपंच नलिनी गिते, उपसरपंच सुरेश गिते, कपोता पाणी वापर संस्थेचे अशोक बोडके, कैलास गिते, अमोल सानप, जगन्नाथ केदार, महादु गिते, शरद गामणे, संभाजी गायकवाड, भिमा गिते, गोविंद दिघोळे, नामदेव दिघोळे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
चौकट...
यंदा शेतक-यांनी सोयाबीन पीकांची पेरणी वेळे आधीच केल्याने अनेकांना दुबार पेरणीची वेळ आली. क्रूषी विभागाने सांगितल्या प्रमाणे पेरणी झाली असती तर बियाणे वाया गेले नसते. अशाही परिस्थतीत लागवड झालेल्या पीकांची निगा कृषी विभागाच्या किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठेवली तर उत्पादन चांगल्या प्रकारे शेतक-यांच्या हाती लागेल.
- ए. एच. गागरे. तालुका कृषी अधिकारी, सिन्नर.