ज्येष्ठांचे मार्गदर्शन समाजासाठी उपयुक्त

By admin | Published: June 27, 2017 12:53 AM2017-06-27T00:53:50+5:302017-06-27T00:54:03+5:30

नाशिक : ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे समाजासाठी नेहेमीच उपयुक्त असते, असे मत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी व्यक्त केले

The guidance of the senior citizens is useful for the community | ज्येष्ठांचे मार्गदर्शन समाजासाठी उपयुक्त

ज्येष्ठांचे मार्गदर्शन समाजासाठी उपयुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे समाजासाठी नेहेमीच उपयुक्त असते, असे मत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी व्यक्त केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरीकांची मंडळे संपूर्ण शहरभर पसरलेली असून विविध विधायक उपक्रम सातत्याने होत असतात. असे कार्यक्रमही समाजासाठी विचार प्रवण करणारे असतात, असेही यावेळी गांगुर्डे सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. मीना बापये यांनी ज्येष्ठ नागरिकांनी वाढत्या वयाबरोबर स्वत:ची वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात मंचचे सभासद असलेल्या ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये शंकर मराठे, कमळाबाई दांगट, सुमन शेपाळ, डॉ मुकुंद फाटक या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. तसेच यावेळी विधायक पत्रकारीते बद्दल लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांच्यासह महेंद्र महाजन व नीलेश अमृतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थीच्या वतीने सुमन शेपाळ आणि महेंद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मंचचे बाळकृष्ण दंडगावकर, ब्रीजमोहन चौधरी आदि उपस्थित होते. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी व जितेंद्र येवले यांनी तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गायिका गीता माळी यांची संगीत मैफली संपन्न झाली.
 

Web Title: The guidance of the senior citizens is useful for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.