दात्याणेतील विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:17 PM2020-02-02T22:17:49+5:302020-02-03T00:27:06+5:30
दात्याणे येथील कर्म. डॉ. वसंतराव पवार जनता विद्यालयात ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ यानुसार विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्र म घेण्यात आला.
ओझर : येथून जवळ असलेल्या दात्याणे येथील कर्म. डॉ. वसंतराव पवार जनता विद्यालयात ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ यानुसार विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्र म घेण्यात आला.
यावेळी विद्यालयात ओझर येथील सुशांत रणशूर सर्पमित्र व त्यांचे सहायक स्वप्निल ढिकले उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक मनोज वाघ यांनी त्यांचा सत्कार केला. सुशांत रणशूर यांनी सापांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या बिनविषारी व विषारी सापांची माहिती दिली. सर्पदंश होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी तसेच जरी सर्पदंश झाला तरी त्यावर करावयाचे प्रथमोपचार व त्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना काय उपाययोजना करावी अशी महत्त्वाची माहिती दिली.
साप आपल्या घराजवळ येऊ नये याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यालयातील वैशाली मोगल, शीतल शिंदे, अलका उगले, सुवर्णा आरोटे, माधुरी चौधरी, भूषण आहेर, पांडुरंग नन्ने, भरत गांगुर्डे, दीपक काळे व आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील आदींनी सहकार्य केले.