विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भयतेसाठी ‘तेजस्विनी’ उपक्रमात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:05 AM2019-07-30T01:05:46+5:302019-07-30T01:06:03+5:30
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात तेजस्विनी २०१९-२० हा आत्मनिर्भयता विषयक मार्गदर्शन कार्यक्र म संपन्न झाला.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात तेजस्विनी २०१९-२० हा आत्मनिर्भयता विषयक मार्गदर्शन कार्यक्र म संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार व गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले उपस्थित होत्या. डॉ. गीतांजली गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली व आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व डॉ. विशाल गुंजाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्र म संपन्न झाला.
व्यासपीठावर मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण पवार, उपमुख्याध्यापक गुलाबराव भामरे उपस्थित होते. डॉ. अतुल कणीकर, डॉ. श्रद्धा वाळवेकर, डॉ. श्रेया कुलकर्णी, डॉ. सुषमा दुगड, डॉ. संगीता लोढा, डॉ. निकिता पाटील यांनी विद्यार्थिनींना व्यायाम, आहार, ताणतणाव, हास्ययोग, किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि त्या संदर्भातील समस्या याविषयी मार्गदर्शन केले.
नीलिमाताई पवार यांनी, प्रत्येक विद्यार्थिनीने आई-वडिलांनी सांगितलेला मोलाचा सल्ला व दाखविलेल्या मार्गाने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे, असे यावेळी सांगितले. तर पौर्णिमा चौघुले यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. शिल्पा दयानंद यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुलभा पवार यांनी केले. यावेळी डॉ. प्रीतिका चौधरी, डॉ. नलिनी बागुल, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. कविता गाडेकर, डॉ. हेमंत सोननीस उपस्थित होते.