दापूर विद्यालयात विद्यार्थीनींना आरोग्यावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:46 PM2018-11-11T17:46:27+5:302018-11-11T17:46:43+5:30

सिन्नर : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Guide to health of students in Dapour Vidyarthi | दापूर विद्यालयात विद्यार्थीनींना आरोग्यावर मार्गदर्शन

दापूर विद्यालयात विद्यार्थीनींना आरोग्यावर मार्गदर्शन

Next

सिन्नर : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सरपंच मुक्ता मोरे, माजी उपसरपंच निशा आव्हाड यांनी नॅपकिनचे वितरण केले.
कार्यक्रमास मंदा आव्हाड, सविता सूर्यवंशी, सुनीता वेताळे, एम. पी. शिरसाठ, एस. एस. बाविस्कर, एस. बी. गोडे, एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते. किशोरावस्था, वयात येणे हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असून मुली वयात येताना मानसिक अवस्था व शारीरिक बदल होत असल्याची माहिती एम. पी. शिरसाठ यांनी दिली. त्यामुळे अनेक प्रश्न, समस्या, शंका, मुलींच्या मनामध्ये निर्माण होतात. हे बदल नैसर्गिक असून आईने मुलीला समजून घेणे गरजेचे आहे. तिच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. शिरसाठ यांनी आरोग्य केंद्रामार्फत देण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे फायदे मुलींना आणि त्यांच्या मातांना सांगितले. आरोग्य पर्यवेक्षिका प्रतिभा वाघ यांनी मुलींच्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी आणि सॅनिटरी नॅपकिनचे महत्व विषद केले.

Web Title: Guide to health of students in Dapour Vidyarthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.