गिनीपिग ठरेल मराठी साहित्यातील मोलाची कादंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:58+5:302021-08-24T04:18:58+5:30

नाशिक : प्रख्यात लेखक राकेश वानखेडे यांच्या गिनीपिग कादंबरीमध्ये आलेला विस्तार हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळींसाठी अज्ञात स्वरुपाचा आहे ...

Guinea pig will be a valuable novel in Marathi literature | गिनीपिग ठरेल मराठी साहित्यातील मोलाची कादंबरी

गिनीपिग ठरेल मराठी साहित्यातील मोलाची कादंबरी

googlenewsNext

नाशिक : प्रख्यात लेखक राकेश वानखेडे यांच्या गिनीपिग कादंबरीमध्ये आलेला विस्तार हा डाव्या आणि आंबेडकरी चळवळींसाठी अज्ञात स्वरुपाचा आहे . भाषा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडी यांच्या व्यामिश्र मांडणीतून ही कादंबरी उलगडत जाते. जी अनेक अर्थाने आजच्या काळातली मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी ठरेल, असा मला विश्वास नाटककार चित्रकार तथा चित्रपट पटकथा लेखक संजय पवार यांनी परशुराम साईखेडकर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला.

या कार्यक्रमात चर्चेत म्हणून डॉक्टर शंकर बोराडे, विष्णुपंत गायखे, प्रा. गंगाधर आहिरे यासह चळवळीतील अनेक लोक उपस्थित होते. संजय पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये साहित्य प्रवाह आणि त्यातील विविध प्रकार यांची चर्चा केली. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात एक चळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा दलित पॅंथरच्या काळातील तरुणांना वाटे. तशी ती आज वाटत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. वानखेडे यांच्या कादंबरीमध्ये आलेला विचारव्यूह हा पूर्वाश्रमीशी न जुळणारा असा अभिनव असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विष्णुपंत गायखे यांनी शेतकऱ्यांचे आजचे प्रश्न त्याचबरोबर ग्लोबलायझेशनमुळे निर्माण झालेली सामाजिक गुंतागुंत यावरचे अत्यंत मार्मीक असे कादंबरीतील उतारे यावेळेस वाचून दाखवले. प्राध्यापक डॉ. शंकर बोराडे यांनी या कादंबरीचा परिप्रेक्ष भिन्न असला तरी त्याचं भाष्य मात्र ग्लोबल असल्याचे निरीक्षण या ठिकाणी व्यक्त केले. त्याचबरोबर कादंबरीत महात्मा गांधी आणि गाडगेबाबा यांच्याशी आपली नाळ जोडणारा नायक रेखाटल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. गंगाधर अहिरे यांनी यांनी सर्व चर्चेचा समारोप करताना आंबेडकरी साहित्य कृतीतील महत्त्वाची कादंबरी असा तिचा उल्लेख केला. लेखक राकेश वानखेडे यांनी चर्चेमध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यांना आणि प्रश्नांना उत्तरे दिली. देवेंद्र उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रोहित गांगुर्डे यांनी केले.

Web Title: Guinea pig will be a valuable novel in Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.