गर्भपातासाठी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:27 AM2019-12-14T01:27:54+5:302019-12-14T01:28:54+5:30

सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Gujarat connection for abortion? | गर्भपातासाठी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन?

गर्भपातासाठी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन?

Next
ठळक मुद्देमाता-बालमृत्यूतही वाढ : शोधासाठी मोहीम

नाशिक : सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारी ९०८ इतकाच आहे. त्यामानाने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये हाच जन्मदर अधिक असल्याचे लक्षात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुलींचे घटते प्रमाण पाहता, गर्भपाताला प्रोत्साहन मिळत असण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केला आहे. राज्यात गर्भपातविरोधी कायदा असून, जिल्ह्णातही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्यामुळे गर्भपाताच्या सोयी नसल्यामुळे कदाचित सुरगाण्याला लागूनच गुजरात राज्य आहे. या राज्यात गर्भपात करून देणारी यंत्रणा कार्यान्वित असावी असा आरोग्य खात्याला संशय आहे. त्यामुळे सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन आहे काय याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भुवनेश्वरी यांनी आरोग्य विभागाला ‘फोकस सुरगाणा’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तंबाखू व दारूमुळे आदिवासी स्त्री व पुरुषांचे वजन कमी होते. त्यातूनच आरोग्यविषयक समस्या उद्भवून मृत्यूच्या घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.
तालुक्यात बाळंतपणात महिला मृत्यूचे तर बालमृत्यूचे प्रमाणही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असून, चालू वर्षी १६९ मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सजग झाला आहे. माता व बालमृत्यूचे वाढते प्रमाण पाहता त्यामागच्या कारणांचाही शोध घेतला असता, प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व दारूचे व्यसन या दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.

Web Title: Gujarat connection for abortion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.