खड्डयांमूळे गुजरात महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:42 PM2020-08-07T14:42:59+5:302020-08-07T14:44:11+5:30
पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नाशिक ते राजबारी चेक नाका दरम्यान मनपा हद्द ते रामशेज, आंबेगण ते सावळघाट व वांगणी ते राजबारी फाटा या जवळपास १५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर कॉक्र ीटीकरण ऐवजी डांबरीकरण करण्यात आल्याने दरवर्षी पाहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. खड्डयात पाणी साचल्याने लहान वाहने बोलीचा अंदाज येत नसल्याने अपघातग्रस्त होतात. शिवाय खड्डे टाळतांना वाहनधारकांना अक्षरश: खो खो चा खेळ खेळावा लागत आहे.
————————————————
सावळघाट व कोटंबी घाटात रस्त्याचे रूंदीकरण करतांना अवघड वळणे तशीच राहील्याने अवजड वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.कोटंबी घाटाच्या पायथ्याशी शाळा, प्रवाशी निवारा शेड व मानवी वस्ती असल्याने या ठिकाणी वारंवार वाहने पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने शालेय विद्यार्थ्यासह प्रवाशांना धोका निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.