शहरातील सर्वच शाळांमध्ये गुलाबपुष्पाने नवागतांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:55 PM2018-06-15T23:55:26+5:302018-06-15T23:55:26+5:30
शहरातील सर्वच शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू झाल्या असून, शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून तसेच गुलाबपुष्प देऊन औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
नाशिक : शहरातील सर्वच शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू झाल्या असून, शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून तसेच गुलाबपुष्प देऊन औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. गंगापूररोडवरील वाघ गुरुजी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप आणि नवागतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रमेश गायखे,बाळासाहेब पाटील, अशोक रकिबे, आशिष पाटील, रसिका शिंदे, रंजना घुले आदी उपस्थित होते. इशस्तवन व स्वागतगीतानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक वनिता शिरसाठ यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुस्तके व खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मंगला गुळे यांनी सूत्रसंचालन केले.
चौव्हाण गर्ल्स हायस्कूल
श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. शाळेत वर्षारंभ उपासनेची सुरुवात सकाळ सत्रात रोहिणी कुलकर्णी व दुपार सत्रात प्राची सराफ यांनी वेदातील श्लोकातून सर्व विद्यार्थिनींना अभ्यास, आहार व शिस्तपालन यांचे महत्त्व सांगितले. उपमुख्याध्यापक सुरेश दीक्षित, पर्यवेक्षक माधव मुठाळ, प्रतिमा खैरनार, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष देशमाने यांंच्या हस्ते विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आली.
नवरचना शाळा
गंगापूररोड येथील नवरचना प्राथमिक शाळेत नवागतांचे पाठ्यपुस्तक, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम ठोके, मधुकर फटांगरे आदी उपस्थित होते. स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी गायकवाड यांनी आभार मानले.
आनंदवली येथील मनपा शाळा
आनंदवली येथील महानगरपालिका शाळा क्र मांक १८ मध्ये प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, पुस्तक दिंडी व प्रभात फेरी काढण्यात आली. अध्यक्षस्थानी भीमराव कडलग होते. प्रारंभी सरस्वतीपूजन करण्यात आले. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या मुला-मुलींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब पूरकर, अनंत दुसाने, शरद मंडलिक, वसंतराव एकबोटे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख कैलास ठाकरे यांनी, तर सूत्रसंचालन कल्पना पाटील यांनी केले. अरु णा पिंगळे यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे निवृत्ती शेवरे, हरिदास भुसारे आदींसह पालक उपस्थित होते.